You are currently viewing श्री.प्रविण हिंदळेकर अग्निशमन दलाच्या अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त!

श्री.प्रविण हिंदळेकर अग्निशमन दलाच्या अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त!

*देवगड तालुक्यातील हिंदळे गावचे मूळ रहिवासी*

 

मुंबई दिनांक ३० एप्रिल, महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन दलाच्या कार्यालय सांताक्रुझ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री.प्रविण हिंदळेकर प्रशासकीय अधिक्षक पदावरून ३३ वर्षाच्या प्रदीर्घ संवेतून सेवानिवृत्त झाले.

या आयोजित कार्यक्रमात संचालक मा.संतोष वारीक यांनी प्रविण याची प्रशासकीय सेवेचा अनुभव हा आपल्या कार्यालयातील प्रशासन आणि इमारत विस्तारीत करण्यात तसेच अग्निशमन दलातील प्रशिक्षणार्थीना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात मोठ योगदान आहे. मुंबईत २६ जुलै २००५ साली महाप्रलयमध्ये अविरत सेवा आपल्या सहकाऱ्यांसह चोखपार पाडली. मा.संचालक यांचेहस्ते शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.

प्रविण हे आमच्यासाठी प्रशासनातील अभ्यासपूर्ण पीठ आहे असा आवर्जुन उल्लेख श्री.मठकर यांनी केला.

प्रविण यांनी महाराष्ट्र शासनाच्या MPSC परीक्षेत १९९२ला उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत पदार्पण केले. याच वेळेस प्रथम नियुक्तीपत्र अग्निशमन दलात सांताक्रुझ कार्यालयात झाली. अग्निशमन दलात प्रशासन विभागात ३३वर्षे समर्पित भावनेतून काम केल. यामुळेच सहकारी यांच्यासह प्रशासना बरोबरच शिस्तबद्धतेचा ठसा उमटवला अस सहकारी श्री.म्हात्रे यांनी गौरवोद्गार उल्लेख केलं.श्री.प्रविण यांच्यासह पत्नी,मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

यापुढील काळात प्रविण कडून सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली.

प्रविणचे मित्र महेश यांनी ५० वर्षाच्या मैत्रीचा उच्च पदावर कार्यरत असतानादेखील मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राहीलेत याचे श्रेय प्रविणला देत शुभेच्छा दिल्या आणि ही मैत्रीपूर्ण प्रेम यापुढील काळात कायम राहील! वडिलांचे अकाली निधनानंतर कौटुंबिक प्रतिकूल परिस्थितीत मात करत शैक्षणिक प्रवास चालू होता. या कार्यक्रमात बंधु श्री.विलास हिंदळेकर,गावचे मित्र,नातेवाईक आणि शालेय सहाकारी आनंद कोचरेकर बृहन्मुंबई अग्निशमन दल आणि मुकुंद कांदळगावंकर आवर्जून उपस्थित होते.

शिक्षण आणि कठोर मेहनत यामुळेच MPSC परीक्षेत यश मिळवून अधिक्षक पदापर्यंत यश संपादन केल.

आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रविण यांनी वरिष्ठांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि सहकारी यांचे सहकार्य लाभल्यामुळेच आपल्या ३३ वर्षांच्या सेवाकालावधीत आपण चागले काम करू शकलो. सांताक्रुझ कार्यालयात प्रशासन आणि तांत्रिक यांचा अभ्यास करत प्रशासन व्यवस्था अधिक दृढ केली. या कालावधीत कुटुंबीय आणि पारीवारीक मित्र याची साथ लाभली. या सर्व कुटुंबीयाप्रती सर्वांचे आभार व्यक्त केले. आपण यापुढील काळात कुटुंबीय आणि समाजिक कार्यासाठी वेळ देणार आहोत असा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमात अग्निशमन दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रशिक्षित जवान उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा