You are currently viewing भव्य हिंदू मंदिर आत्ता मुस्लिम राष्ट्रात दिमाखात उभे राहणार!!!!!

भव्य हिंदू मंदिर आत्ता मुस्लिम राष्ट्रात दिमाखात उभे राहणार!!!!!

अबु धाबी- संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीमध्ये पारंपरिक पद्धतीने भव्य अशा हिंदू मंदिराची उभारणी केली जात आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या उभारणीसाठी यूएई आणि भारत या दोन्ही देशात काम केलं जात आहे. गुजरात आणि राजस्थानमधील २ हजारपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम यूएईमध्ये मंदिराच्या उभारणीसाठी पाठवलं जाणार आहे.

 

BAPS स्वामीनारायण मंदिराची पायाभरणी २०२० च्या एप्रिलमध्येच झाली होती, पण कोरोना महामारीच्या संसर्गामुळे बांधकाम काही काळ थांबले होते. पण, डिसेंबर महिन्यापासून कामाने गती घेतली असून मंदिराचे काही फोटो समोर आले आहेत. यूएईमधील हे पहिल्या प्रकारचे पारंपरिक हिंदू मंदिर असून BAPS स्वामीनाराणय संस्था या मंदिराची उभारणी करत आहे.

मंदिर अबु मुरेखातील अल रहबा भागात उभारलं जात आहे. पूर्व मध्य आशियातील हे पारंपरिक प्रकारचे संपूर्णपणे दगडाने बनवले जात असलेले पहिले हिंदू मंदिर आहे.

ब्रह्मविहारी स्वामी इतर अधिकाऱ्यांसोबत मिळून BAPS हिंदू मंदिर उभारणीचं काम पाहात आहेत. स्थानिक राज्यकर्त्यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. भारतामधून हातांनी घडवलेले शिल्पकाम यूएईमध्ये आणले जात आहे. यात भारताचा सांस्कृतिक इतिहास, देवी-देवता यांचे चित्रण दाखवले जाणार आहे. तसेच हिंदू धारणा आणि रामायण, महाभारतातील प्रसंग या शिल्पामधून दिसून येणार आहे. यूएईच्या ७ राज्यकर्त्यांना दर्शवणारे सात शिखर मंदिराला असतील. मंदिराचे बांधकाम २०२० च्या दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतातून अनेक लोक कामासाठी यूएईमध्ये जातात. अनेक लोक तेथेच जाऊन स्थायिक झाले आहे. यूएईच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ३० टक्के लोक भारतीय आहेत. यूएईमधील हिंदू मंदिराच्या उभारणीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक विस्तारले जाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा