You are currently viewing विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि पालकांना योग्य दिशा मिळावी यासाठी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्या करिअर मार्गदर्शन केंद्रातर्फे शनिवार, दि. १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रम न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, इंडस्ट्रियल इस्टेट कंपाऊंड, डॉ. आंबेडकर रोड, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई ४०० ०१२ या ठिकाणी होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.

इ. १० वी व १२ वी नंतरच्या शैक्षणिक व व्यावसायिक संधींबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

*प्रमुख पाहुणे: डॉ. संकल्प राव – संचालक, आयटीएम इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्सेस*

*मार्गदर्शक: समर्थ पालकर – संचालक, समर्थ एज्युकेअर, विषय: १० वी, १२ वी नंतरच्या परदेशातील करिअर संधी*

*शर्मिला लोंढे – व्याख्याता व करिअर समुपदेशक, विषय: १० वी, १२ वी नंतरचे करिअर पर्याय, आव्हाने आणि नियोजन*

कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी विकास शिंदे – मंडळप्रमुख, उमेश निंबरे – प्रमुख, करिअर मार्गदर्शन केंद्र, अरुण तळगावकर – सहायक प्रमुख, करिअर मार्गदर्शन केंद्र यांच्याशी पुढील क्रमांकांवर संपर्क साधू शकता. ९८७०४२२९५९ / ९००४६७३२२४ / ९४२१७४६२४९ विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा