You are currently viewing महिला लोकशाही दिन 17 ऑक्टोबर रोजी

महिला लोकशाही दिन 17 ऑक्टोबर रोजी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर 2022रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ  यांनी केले आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्कांचे व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुण्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा