You are currently viewing जग कसे आहे ?

जग कसे आहे ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी पांडुरंग वसंत कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जग कसे आहे?*

 

आपण आनंदी असतो तेंव्हा

चंद्रतारे कसे सुंदर दिसतात

आपण दुःखी असतो तेंव्हा

हेच सारे उदासवाणे वाटतात……1

 

निसर्ग नेहमी तटस्थ असतो

म्हणून काही तो कठोर नसतो

आपल्या असण्यानसण्यामुळे

त्याला फरक पडत नसतो…….2

 

उद्या आपण नसलो तरी

सूर्य मात्र उगवणारच आहे

चंद्रही नभात दिसणार आहे

झाडावर फुल उमलणार आहे….3

 

निसर्ग ना सुंदर आहे ना कुरूप

तो आहे तसाच असणार आहे

आपल्याच भावनानी तसं त्यांना

आपण नेहमी ठरविणार आहे…..4

 

म्हणून….

 

उदास माणसाला सर्व जग

उदासच नेहमी वाटत असतं

आनंदी माणसाला सर्व जग

आनंदीच नेहमी वाटत असतं…..5

 

*पांडुरंग कुलकर्णी नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा