*श्रेयांका श्रेयस कुलकर्णीला ग्लोबल अवॉर्ड*
दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी चित्रनगरी गोरेगाव मुंबई येथे चार वर्षाची बाल प्रतिभा कलाकार कुमारी श्रेयांका श्रेयस कुलकर्णी हिला बॉलिवूडचा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय काफ अवॉर्ड मिळाला त्याबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एवढ्या कमी वयात संस्कृत मधे असणारी रामरक्षा ती तोंडपाठ छान म्हणते. तेही अगदी 5 मिनिटात. मारुती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष इत्यादी स्तोत्रेही तिची स्पष्ट उच्चारासह पाठ आहेत. दादासाहेब फाळके यांच्या 155 व्या जयंती दिवशी नोबेल नामांकन प्राप्त आठ पिएचडी प्राप्त शिक्षण महर्षी आदरणीय प्रिन्सिपॉल डॉ रामदास दशरथ आबणे यांचा आशीर्वाद तिला मिळाला व दादासाहेब फाळके यांच्या नातीच्या हस्ते पांडुरंग कुलकर्णी यांच्या नातीला हे अवॉर्ड मिळाले. नातेवाईक मित्रमंडळ व समाजाच्या सर्व स्तरातून तिचे खूप कौतुक होत आहे.
तिच्या साठी तिचे आजोबा व साहित्य कला व्यक्तिमत्व विकास समूहाचे अध्यक्ष श्री पांडुरंग कुलकर्णी यांनी लिहिलेली सुंदर कविता पहा कशी आहे.
*=== गोड तक्रार ===*
आई बघ गं दादा कशा खोड्या काढीतो
ईकडून तिकडून येतो आणि गालगुच्चा घेतो
चाफ्याची ती फूले सारी गोळा केली मी
जास्त घेतली दादाने बघ मला किती कमी
भातुकलीच्या बाहुलीचा गालगुच्चा घेतो
न्हाऊ घालताना तिचा खाऊ घेऊन जातो
चिमणचारा टाकुन केल्या चिमण्या गोळा
खड्यामागे टिपू धावला चिमण्या सार्या गेल्या
झाडावरती बसुन दादाने खडा होता मारला
रडु लागल्यावरती माझे डोळे पूसू लागला
तूला सांगितल्यावर आई बोलत तो नाही
त्याच्यावाचुन आई मला मग करमत गं नाही!!!
*•••••••••••• पांडुरंग कुलकर्णी.*

