*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऋतूसवे मी फुलले*
ऋतू सवे मी फुलले..
गंधित झाले
वा-यासह पसरले…
फुलपाखरू झाले
वेलींवर भिरभिरले….
फुलाफुलांतुनी
रंग उधळले…
कणकण परागांचे
भुंग्यांना अर्पिले…
ऋतूसवे मी फुलले….
मी आतुरले…
मनी काहुरले..
अस्वस्थ मनी..
माझी मी ना उरले…
ध्यान लागले..
तुझ्या रुपाचे..
नकळत वाट बघू लागले
ऋतूसवे मी फुलले….
सृष्टी यौवन
रंग गंधले…
फळाफुलांनी मोहरलेले...
तप्त उन्हाळी
झळा सोसुनी
बहाव्यात खुलले….
कोकीळकंठी गीतमोहिनी
आम्रतरू बहरात डवरले
रूप रस गंधात न्हाले
ऋतू सवे मी फुलले…!!🪻🍃
अरुणा दुद्दलवार ☘️🐦🔥
