कणकवली
जानवली येथील सदनिकाधारकानीं आपल्या मागण्यांसाठी केलेले लाक्षणिक उपोषण अखेर भाजपा आमदार नितेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर स्थगित केले. सोसायटीत ट्रांसफार्मर अनधिकृत बसवणाऱ्या अधिकारी व वीज वितरणाच्या ठेकेदारावर कारवाई बाबत योग्य निर्णय घेऊन फ्लॅटधारकाना न्याय देण्यात येईल.सदर ट्रान्सफार्मर बसवते वेळी विद्युत निरीक्षक यांची परवानगी नसल्याने तो ट्रान्सफार्मर अनधिकृत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही इमारतींसाठी खोदलेल्या शोषखड्ड्यांबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली. त्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सरबत घेत फ्लॅटधारकानी आपले उपोषण स्थगित केले.