कणकवलीत भंगार साहित्याला आग….

कणकवलीत भंगार साहित्याला आग….

न.प.च्या अग्निशामक बंबाद्वारे आग विझवली

कणकवली:

​शहरातील हॉटेल सह्याद्री कडून तेली आळीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या अंबाजी सुभरावर इंगळे यांच्या घरासमोरील भंगार सामानाला आग लागली. ही घटना ​१२ वा.च्या सुमारास घडली.या घटनेची बातमी मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,नगरसेवक अभिजित मुसळे,संजय कामतेकर,शिशिर परुळेकर,प्रदीप मांजरेकर,रुपेश नार्वेकर राजू गवाणकर,गौरव हर्णे,मिथुन ठाणेकर ,महेश कोदे, संकेत नाईक,ग्रामस्थ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन न.प.च्या बंबाच्या सहायाने आग विजवण्यात आली.
दरम्यान ही आग रस्त्यालगत असलेल्या भंगार सामानाच्या बाजूला कचऱ्याच्या ढिगाला आग लागून सर्वत्र पसरत होती.या भंगार साहित्यात डांबरचे बॅरल,फ्रीज,आदी इलेक्ट्रिक गोष्टीमुळे आगीची तीव्रता वाढत होती. या घटनेमुळे शहरातील वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनेने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा