You are currently viewing आमदार निलेश राणेंची वचनपूर्ती…

आमदार निलेश राणेंची वचनपूर्ती…

आमदार निलेश राणेंची वचनपूर्ती…

१५ वर्षांची मागणी, १५ दिवसांत पूर्ण…

सिंधुदुर्गनगरी

अणाव गावातील नागरिकांची १५ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या वचनानुसार, सिंधुदुर्गनगरी गरुड सर्कल ते अणाव मांजरेकरवाडी आणि ओरोस जिल्हा कारागृहाकडे जाणारा रस्ता अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात आला आहे. नूकतेच राणे यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते.

अणाव गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने आणि जिल्हा कारागृहाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न करत होते, परंतु निधीअभावी हे काम रखडले होते.

आमदार निलेश राणे यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन २८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि तातडीने रस्त्याचे काम पूर्ण केले. या कार्याबद्दल अणाव ग्रामस्थ आणि जिल्हा कारागृह प्रशासनाने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा