You are currently viewing शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखेत पारंपारिक शिवजयंती साजरी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखेत पारंपारिक शिवजयंती साजरी

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखेत पारंपारिक शिवजयंती साजरी*

*माजी आमदार वैभव नाईक यांनी शिव पुतळ्यास पुष्पहार केला अर्पण*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखा येथे दरवर्षीप्रमाणे मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपारिक शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शिव पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसेच शिवजयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याठिकाणी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, पूनम चव्हाण,दिपा शिंदे,निनाक्षी शिंदे ,उमेश मांजरेकर,हेमंत मोंडकर,मनोज मोंडकर,नरेश हुले,भगवान लुडबे,भाग्यश्री लाकडे,दादा पाटकर,चिंतामणी मयेकर,सुरेश माडये ,अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा