You are currently viewing सुगंधी वसा

सुगंधी वसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुगंधी वसा*

 

सुंदर, सोज्वळ, सात्विक, निर्मळ, आणि सुगंधीत

शुभ्र-केशरी दो रंगांचे, पवित्र अद्वैत

ज्या भूमीतून जन्म घेतला, लाभले स्वरूप

त्या धरणीशी कृतज्ञतेने, व्हावे एकरूप

 

प्राजक्ताचे स्थान सदैव, असते प्रभू चरणी

त्या सम जावे लीनतेने, आपण ईश-शरणी

आरोग्याचे दान देतसे, तरू प्राजक्ताचा

अल्पायुष्यी दरवळे परिमळ, अलिप्त सार्थकतेचा

 

किती जगलो? या परी कैसे जगणे झाले?

आम्हामागुती अवघ्यांनी द्यावे, गौरव-कुसुम झेले

संदेश हा मोलाचा देई, प्राजक्त इवलासा

मूर्ती लहान परि, महान किर्ती, घ्यावा सुगंधी वसा

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा