*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित चित्रकाव्य*
*चित्रकाव्य*
मेहंदी हाताला लावताना
स्वप्न सुखाचे पहिले होते
फेरे सात घेतांना
तुला मी वाहीले होते
डोळ्यांदेखत सारे
क्षणात संपून गेले
तुझ्या सोबत सख्यारे
जगायचे राहून गेले
सोडून हात माझा
एकटाच निघून गेला
खेळ आपला भातुकलीचा
मांडायचा राहून गेला
सहा दिवसांची सोबत तुझी
अशी मध्येच का सुटली
सात जन्माची गाठ
एका दिवसातच तुटली
निःशब्द होऊन मी
स्तब्ध देह पहात होते
माझ्याच हातानी मी
कुंकू पुसून घेत होते
तुझ्या माझ्या आयुष्याचा प्रवास
अपुर्णच रहिला
मृत्यूने ही शेवटी धर्म पाहिला
*(संजय धनगव्हाळ)*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१७
