*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*…आणि त्यांनी विचारला तो फक्त धर्म*
नेहमी खरे बोलावे असे
बिंबलेले जीवनाचे वर्म
सूडाच्या भावनेने पेटलेले
म्हणूनच विचारला फक्त धर्म!
क्रूरतेची परिसीमा झाली
बंदुकीतून गोळी निघाली
निष्पाप जीवांचा घेऊन बळी
नराधमांना शांती मिळाली
अरे धर्मांध नराधमानो,
कुठे फेडाल हे पाप..?
मृत्यूने मान खाली घालावी
तो सुध्दा देईल तुम्हा शाप !
कुणी दिला हक्क तुम्हाला
कशी नाही वाटली लाज
भारत कसा क्षमा करील..?
तुमचे अघोरी अराजक राज
सर्वधर्मसमभाव हे आमचे
जुन्या काळापासून ब्रीदवाक्य
आणि.. तुम्ही विचारून धर्म
केले नको ते निंदनीय शक्य
भले तरी देऊ गाठीची लंगोटी
शिकवण आम्हा संतांची
परंतु आता वेळ आली
जशास तसे शिकवण्याची
विचारला फक्त धर्म तुम्ही
तुमच्या तोंडचे पाणी पळवून
हाकलून देऊ तुम्हाला आता
उभ्या जगाच्या नकाशातून
प्रतिभा पिटके
अमरावती
9421828413