You are currently viewing पावसाळ्यात अखंड वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी योग्य ते नियोजन करा…

पावसाळ्यात अखंड वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी योग्य ते नियोजन करा…

पावसाळ्यात अखंड वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी योग्य ते नियोजन करा…

जिल्हा ग्राहक संघटनेची मागणी; वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांची घेतली भेट…

कुडाळ

पावसाळ्यात अखंड वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी योग्य ती उपायोजना आत्तापासून करा, आवश्यक त्या ठिकाणी झाडी तोडा तसेच जुने झालेले पोल, वीज वाहिन्या बदला, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता अरविंद वनमोरे यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान कोणालाही पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन तोडण्यात येवू नये, आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला सुरक्षा कुंपण घालावे तसेच जिल्ह्यात मंजूर झालेली नवीन वीज वाहिन्या टाकणे, विद्युत पोल बदलणे आदी कामे लवकरात-लवकर करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज संघटनेच्या माध्यमातून कुडाळ येथे जाऊन श्री. वनमोरे यांची भेट घेण्यात आली.

यावेळी यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रभारी अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, व्यापारी महासंघाचे संजय भोगटे, इर्शाद शेख, तुकाराम म्हापसेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष गोविंद सावंत, प्रशांत राधाकृष्ण पेडणेकर, नारायण पेडणेकर, श्यामसुंदर राय, योगेश तांडेल आदी वीज ग्राहक संघटना जिल्हा व तालुका संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा