सिंधुदुर्गमध्ये वीज ग्राहकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या बैठक
अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर
कुडाळ
वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि या संदर्भात अधीक्षक अभियंता, महावितरण, कुडाळ यांना निवेदन सादर करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक उद्या, दिनांक २८ एप्रिल रोजी दुपारी ठीक १२ वाजता अधीक्षक अभियंता, महावितरण, एम. आय. डी. सी. कुडाळ, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात होणार आहे.
वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्ष आणि सचिव यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी आणि सर्व वीज ग्राहकांना या महत्त्वपूर्ण बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीत वीज ग्राहकांच्या विविध समस्यांवर विचारमंथन करून त्या सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, असे म्हटले आहे.
