*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घडत नाही.. तो माणूस?…*
परिस्थितीने माणूस घडतो परिस्थिती सापेक्ष
नाण्याच्या ह्या दोन बाजू दोनच असती पक्ष…
कितीही शिकवा कितीही घडवा दगड काही असतात
कितीही ओता पाणी त्यावर कोरडेच राहतात..
परिणाम ना कसला होतो गेल्या गोवऱ्या जरी
साधूवेशी असती बगळे ओळख त्यांची खरी
लापट असती अट्टल चमचे तूप नित्य शोधती
गुंडाळून ठेवलीच असते सदाच न्याय नि नीति…
सायरसुतक कसले नसते ढवळत राहती सदा
नम्रतेच्या मधाळ त्यांच्या पाहून घ्याव्या अदा
फसती बिचारे नवखे कोणी रूप ओळखू न येते
चबरचबर ते करत राहती जणू असू जगज्जेते..
धर्माचा नि देवाचा तर असा प्रपोगंडा
तीर्था जाणे हाच तयांचा नित्य असे फंडा
दुर्गुण सारे ओतप्रोत हे बघून शिसारी यावी
झोळी त्यांची सदा फाटकी कशी कळून यावी…
कधी न शिकतील ना ही सुधरतील हीच खूणगाठ
जन्मापासून ब्रीद तयांचे, ते असती फक्त “भाट”
गाठ पडते क्लेशकारक मुखदर्शन हो त्यांचे
नशिबी आले समजून घ्यावे, “पाप कुण्या जन्माचे”…..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)