सावंतवाडीतील ज्येष्ठ डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचे निधन…
सावंतवाडी
सालईवाडा भागात अनेक रुग्णांना सेवा देणारे येथील ज्येष्ठ डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर यांचे आज दुपारी माठेवाडा येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांनी गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात सालईवाडा भागात डॉक्टर म्हणून सेवा बजावली होती. गुणकारी डॉक्टर म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कशाळीकर मेडिकलचे मालक मकरंद आणि अनिरुद्ध तर डाॅ. सुबोधन कशाळीकर यांचे ते वडील होत.in

