माडखोल येथे वीजेच्या धक्क्याने सिमेंट कारखान्यातील कामगाराचा मृत्यू
सावंतवाडी
माडखोल येथील एका सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराचा वीजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला. प्रतीक बच्चुभाई पोकर (वय ३३, रा. कोलगाव-चाफेआळी) असे दुर्दैवी मृताचे नाव आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती लशी की, प्रतीक पोकर हा सिमेंट कारखान्यात कार्यरत होता. आज मोटार पंप चालू करून त्यावर पाणी मारत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच त्याच्या भावाने, शैलेश कुमार पोकार यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यानंतर प्रतीकला तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सावंतवाडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

