*पहलगाम हल्ल्याचा फोंडाघाट वासीयांकडुन तीव्र शब्दात निषेध.
मृृतांना वाहीली भावपुर्ण श्रध्दांजली
फोंडाघाट
*पहलगाम हल्ल्याचा फोंडाघाट वासीयांकडुन तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी मृृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी अध्यक्ष श्री.यशवंत मसुरकर, आबा मर्य, संतोष टक्के उपस्थित होते #अनाम विरा जिथे जाहाला तुझा जीवनांत स्तंभ जिथे ना कुणी बांधला पेटविली न वात.असे म्हणुन टक्के यांनी श्रध्दांजली वाहीली.
अजित नाडकर्णी यांनी श्रध्दांजली वाहीली आणि धर्म विचारुन आतंकवाद्यांनी केलेल्या नरसंहाराची निषेध केला.सरकार यांना सडेतोड उत्तर देईल असे सांगितले.सरपंच सौ.संजना आग्रे यांनीही तीव्र शब्दात श्रध्दांजली आणि केला जाहीर निषेध.सर्व व्यापारीही श्री.राधाकृष्ण मंदिरात हजर होते.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*


