*शालेय मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाली चुरशीची निवडणूक :*
सावंतवाडी
शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५ रोजी प्रशालेतील विद्यार्थी उमेदवारांच्या निवडणुका घेण्यात आल्या. शैक्षिणक वर्ष २०२५ – २६ मध्ये केल्या गेलेल्या निकशांचे मूल्यांकनाद्वारे जसे की, इंग्रजी भाषेत बोलणे, विद्यार्थ्यांचा गणवेश, स्वयंशिस्त, शालेय वाहतूक व मेस मधील विद्यार्थ्यांची वर्तणूक इत्यादी व शैक्षणिक गुणवत्ता यांचे मूल्यांकन करून विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुख तसेच प्रत्येक हाऊसचे कप्तान व उपकप्तान म्हणून खालील विद्यार्थ्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थी प्रमुख म्हणून इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी प्रमुख म्हणून ‘ कु. तनिष्क पवार ‘ व ‘कु. हेरंभ नाटेकर ‘ तर विद्यार्थिनी प्रमुख म्हणून ‘ कु. साईना अळवणी’ व ‘ कु. स्पृहा आरोंदेकर ‘ यांना उमेदवारी देण्यात आली. या विद्यार्थ्यांना विशिष्ट चिन्हे दिली गेली. यामध्ये अनुक्रमे कु. तनिष्क पवार या विद्यार्थ्याला ‘ पृथ्वी ‘, कु. हेरंभ नाटेकरला ‘ सूर्य ‘ , कु. साईना अळवणी हिला ‘ चांदणी ‘ व कु. स्पृहा आरोंदेकर हिला ‘ चंद्र ‘ ही चिन्हे देण्यात आली. त्याचप्रमाणे, प्रत्येक हाऊसचे कप्तान व उपकप्तान म्हणून पुढील विद्यार्थ्यांना उमेदवारी देण्यात आली. अग्नी हाऊसचे कप्तान म्हणून इयत्ता ६ वी मधील ‘ कु. भुवन दळवी ‘ व ‘ कु. प्रत्युशा घोगळे ‘ उपकाप्तन म्हणून इयत्ता ५ वी मधील ‘ कु. वरद राणे ‘ व ‘ कु. कुशल तांडेल’, वायू हाऊस मधील कप्तान म्हणून इयत्ता ६ वी मधील ‘ कु. देवांग सारंग ‘ व ‘ कु. भूमी नानोस्कर ‘ तर उपकप्तान म्हणून इयत्ता ५ वी मधील ‘ कु. वरद सावंत ‘ व ‘ कु. जान्हवी सावंत ‘ , पृथ्वी हाऊस मधील कप्तान म्हणून इयत्ता ६ वी मधील ‘ कु. नील सावंत ‘ व ‘ कु. अवनी शेर्लेकर ‘ तर उपकप्तान म्हणून इयत्ता ५ वी मधील ‘ कु. कविश पेडणेकर ‘ व ‘ कु. सई नाईक ‘ हिची , जल हाऊस मध्ये कप्तान म्हणून इयत्ता ६ वी मधील ‘ कु. कॅल्व्हर्ट फर्नांडिस ‘ व ‘ कु. आरोही सावंत ‘ तर उपकप्तान म्हणून इयत्ता ५ वी मधील ‘ कु. रुद्र मालवणकर ‘ व ‘ कु. अनिका सुकी ‘ या विद्यार्थ्यांना उमेदवारी देण्यात आली. या विद्यार्थ्यांची नावे परिपाठाच्या वेळी घोषित करण्यात आली. तसेच पालकांना देखील सूचित करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपण आपल्या शाळेसाठी व हाऊससाठी कशाप्रकारे मदत करू, प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास तिथे आपण कशाप्रकारे निरसन करू, हे सांगून विद्यार्थी उमेदवारांनी प्रचार केला. प्रचारासाठी त्यांना चार दिवसांचा कालावधी देण्यात आला व आजच्या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत प्रथम प्रत्येक हाऊसच्या कप्तान व उपकप्तान उमेदवारांना त्या त्या हाऊसच्याच विद्यार्थ्यांनी मतदानपेटीत मते दिली. तर इयत्ता २ री ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी प्रमुख व विद्यार्थिनी प्रमुख यांची निवड करण्यासाठी निवडणूक कक्षेत आपली मते घातली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी जशी बाह्य निवडणूक होते त्याचप्रकारे प्रशालेत निवडणूक घेतली गेली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदानाचा अधिकार बाजल्याचा शिक्कमोर्तब केला गेला आणि विद्यार्थ्यांना निवडणुकीची प्रक्रिया समजवण्यात आली. या मतदान प्रक्रियेत अधिकारी म्हणून क्रीडा शिक्षक श्री. शैलेश नाईक सर, तसेच शालेय निवडणूक प्रमुख म्हणून प्रशालेतील समन्वयक सौ. सुषमा पालव व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कामगिरी बजावली. अशाप्रकारे आजची ही निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शी पर पडली. शाळेचे संचालक. श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी या निवडणूक प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांस प्रोत्साहन दिले.

