सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परब मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी वर्ग यांचे व्यवसाय, शिक्षण आणि स्पर्धात्मक युगात उज्ज्वल भविष्य घडावे या उदात्त हेतूने रविवार २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ३.३० वाजता ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात येथे परब मराठा समाज सिंधुदुर्गची तातडीची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत परब मराठा समाज सिंधुदुर्ग सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्गातील परब मराठा समाज बांधवांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

