*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नातं पतीपत्नीचं*
नातं पतीपत्नीचं
अतूट विश्वासाचं
एकमेकांशिवाय
अधुरेपणाचं
संसार रथाची दोन चाकं
एकमेका असती पूरक
घट्ट असणारे हे नाते
विश्वास दोघांचाही समर्पक
कुठला तो, अन, कुठली ती
योगायोग जुळून येतात
अनोळखी दोन मूक मने
जन्मभर नातं टिकवितात
शेवटपर्यंत टिकणारे हे नातं
समाजाचे मूल्य जपतात
कोणी कुणाचं नसतं तरी
पती पत्नी एकमेकाचेच असतात
तुझं माझं जमेना तरी
तुझ्याशिवाय होत नाही
कट्टी दोस्ती केल्याशिवाय
संसाराला रंगत नाही
संसार नाही पत्यांचा खेळ
खेळावाच लागतो जिद्दीने
मनासारखी पानेनसली तरी
डाव मांडलेला असतो जोडीने
प्रतिभा पिटके
अमरावती
9421828413

