You are currently viewing पुस्तकांना मित्र माना 

पुस्तकांना मित्र माना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी यांनी पुस्तक दिन निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

 

पुस्तकांना मित्र माना 

——————————————————

 

पुस्तकांना मित्र माना, करुन त्यांना वंदना

ग्रंथ देती ज्ञान आम्हा, नको त्यांची वंचना

विद्या, कला सारी शास्त्रे

ग्रंथामध्ये एकवटती

जगण्याचे मार्ग भले

त्यांच्यातच सापडती

ऱ्हदयातच स्थान दया ना, तीच त्यांची अर्चना

ग्रंथ देती ज्ञान आम्हा, नको त्यांची वंचना

गुरु समान ग्रंथ हे

तेच देती ज्ञानदृष्टी

ग्रंथ जगाची खिडकी

ग्रंथ आनंदाची वृष्टी

पोहोचो ते साऱ्या जगी, हिच एक प्रार्थना

ग्रंथ देती ज्ञान आम्हा, नको त्यांची वंचना

ग्रंथाविना भासतसे

रितेसे उदरभरण

त्याच्यातच दडलेले

ग्रंथाचे अमरपण

पसरो जगी राज्य त्यांचे, हिच असे कामना

ग्रंथ देती ज्ञान आम्हा, नको त्यांची वंचना

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा