*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम लेख*
*अक्षर वाङ्मयाचे सामर्थ्य*
सामर्थ्य लेखणीचे बोल समर्थांचे,
ठसा उमटवणारे वास्तव दर्शन लेखणीचे,
अक्षर वाटोळे, मोकळे, सुबक एक साचे
ध्यानात घ्यावे महत्त्व अलंकार वृत्ताचे,
ठेवावे भान रस्व दीर्घ कान मात्रेचे,
नीटनेटके मध्यम अक्षर ठसठशीत,
शब्द मोजके सुंदर चित्राने बध्द होते पुस्तकात
अनुभव सिद्ध लेखन प्रतिभा असावी उदात्त,
स्वल्पविराम, अनुस्वार बसवावे नियमात,
अर्थ समजून चातुर्याने शब्द कोरावा,
धर्म जातीच्या पलाड विषय मांडावा,
उत्कट कीर्ती उरावी प्राणिमात्रास वाटे हेवा,
समर्थ बोलती लोकांनी ऐसा लेखक पहावा.
गद्यपद्य साहित्याने संस्कृती जतन ,
विविध कथा, कादंबरी ,काव्य, निबंध लेखन ,
शब्द गुंफती चारोळी, गझल, आर्या, कवन,
रामायण महाभारत देती जिवंत व्यवहार ज्ञान,
उपनिषदे, दासबोध, ज्ञानेश्वरी अक्षय लेणी, गीता ,वेद ,ऋचा ,गाथा ज्ञानाच्या खाणी,
अभंग भारुड ओव्या पोवाडे लावणी,
चिरंतर राहतील भाषा सौंदर्याची लेणी,
निर्भीड विचारधारा करिती जनजागृती ,
होते राजकीय सामाजिक धार्मिक क्रांती, इतिहास ,बखरी, न्यायशास्त्र वास्तव सांगती
ही ग्रंथसंपदा असती एकटेपणाची सोबती,
अशक्य बोलणे ते लिहिणे शक्य
मुक्त विचार लिहावे स्वांत सुखाय .
मनातील भाव देतील शब्दांना न्याय,
धारदार लेखणी पुढे जीभेची बिशाद काय?
*प्रतिभा फणसळकर*
