वाळू शिल्पाच्या माध्यमातून पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली…
वेंगुर्ले
पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आरवली सोन्सुरे येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी आपल्या वाळू शिल्पकलेतून श्रद्धांजली वाहिली आहे.
धर्मांध दहशतवाद्यांकडून पर्यटनासाठी पहलगाम येथे गेलेल्या सुमारे २५ हून अधिक भारतीय नागरिक व कर्तव्यावर असणाऱ्या भारतीय सैनिकांची द्वेषपूर्वक निर्घृण हत्या करण्यात आली. या कृत्याचा सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. निषेध नोंदवतानाच कलाकार रविराज चीपकर यांनी वाळू शिल्पाद्वारे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिले आहे.
