You are currently viewing सावंतवाडीत 26 रोजी ‘कथक संध्या’ रंगणार, शंभरहून अधिक नृत्यांगणांचा कलाविष्कार झळकणार !

सावंतवाडीत 26 रोजी ‘कथक संध्या’ रंगणार, शंभरहून अधिक नृत्यांगणांचा कलाविष्कार झळकणार !

सावंतवाडीत 26 रोजी ‘कथक संध्या’ रंगणार, शंभरहून अधिक नृत्यांगणांचा कलाविष्कार झळकणार !

सावंतवाडी :

‘नृत्यांगण’ कथ्थक क्लासेस, सिंधुदुर्ग यांच्यावतीने 26 एप्रिल रोजी सावंतवाडी शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे सायंकाळी सहा वाजता ‘कथक संध्या’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बहारदार कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 100 हून अधिक कथ्थक कलाकार आपल्या नृत्याविष्काराचे दर्शन घडविणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कथ्थक प्रेमींसाठी ही फार मोठी पर्वणी आहे. तरी नृत्य प्रेमी व कथ्थक प्रेमी यांनी या कलाविष्काराचा आस्वाद घेण्याचे आवाहन, कथ्थक क्लासेस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा