*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मन माझे*
माझेच मन होते कधी पांखरू,
हलकेच ऊडू लागते वार्यावरू,
जाईल कोठे कधी अन् कसे?
कशी मी त्यास आवरू!
मन होते माझे स्वच्छंद,
शोधू पहाते त्यात आनंद,
मिळता आनंद होते बेधुंद,
कशी कोठेआणि कसे करू मी बंद!
बागडता स्वच्छंद बेधूंद,
माझे मन वारूवर झाले स्वार,
बेफाम बेलगाम झाला वारू,
कसे कोठे आणि कशी सावरू!
स्वच्छंद बेधूंद ऊडून मन,
झाले हो आनंद विभोर,
हळुवार काळजात शिरले अलगद्
कधी कूठे आणि कशी दडवू मनास मी अलवार.
अनुराधा जोशी.
अंधेरी मुं. 69
9820023605

