*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असेन मी नसेन मी*
उगवलेला दिवस
मावळेलही तसा
असेन मी नसेन मी
हा तर स्वच्छ आरसा…
जन्माला आलो तर
घ्यायचं खुशाल जगून
माणुसकीची आस
अंतरात ठेवावी जपून…
दु:ख करावं बाजूला
शोधावं सुख सतत
उन्हात पोळेल जीव
जावं सावली शोधत..
दिनदुबळ्यांची सेवा
घडो आपल्या हाती
आनंद वाटू जगात
उजळू असंख्य वाती…
असेन मी नसेन मी
अक्षररूपी उरावे
क्वचित कोणी स्मरता
नाव जगी निघावे….
अरुणा दुद्दलवार @✍️
