*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोडवा आंब्याचा*
🥭🥭🥭🥭🥭🥭
कोकणच्या लाल मातीत
फळांचा राजा जन्मतो
डोंगरावरच्या आमराईत
फांद्यावरती लगडतो
ग्रिष्माचे चटके सोसत
कातळ भूगर्भात वाढतो
ऊन पाऊस धुक्यातही
कधीच न तो डगमगतो
कडाक्याच्या थंडीमध्ये
पानोपानी मोहरतो
कोकिळेच्या धुंद स्वरात
सुवासाने दरवळतो
हापूस पायरी निलम
विविध याच्या जाती
रसदार अवीट गोडीने
जपतो प्रत्येक नाती
पक्व होताना आंबा
आंबट दुर्गुण फेकतो
पिवळ्या गोड रसाने
शरीर आपले भरतो
शरीरातील गोड कुंडले
सर्व सजीवांना वाटतो
सर्वस्वाचे दान करणारा
दानशूर कर्ण भासतो
*✒️© सौ.आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

