*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाही करणार पुन्हा…*
वाढे उन्हाचा तडाखा
जीवा सोसवेना आता
तोडल्यात वृक्षवेली
जरी सोयरे म्हणता
नाही पिण्यासाठी पाणी
पाखरेही दीनवाणी
पाणी शोधीत फिरती
सारे जंगलचे प्राणी
घोटभर पाण्यासाठी
आज सारे तरसती
पाण्याविन उजाडही
झाली सारीच धरती
कलियुगी माणसाला
भारी हाव ही पैशाची
केली झाडांची कत्तल
थट्टा केली निसर्गाची
निसर्गाची किमयाही
आता कळाली मानवा
जपू जिवापाड तया
होई शांत सूर्यदेवा
आम्ही केली वृक्षतोड
घोर घडला हा गुन्हा
छेडछाड निसर्गाशी
नाही करणार पुन्हा
@अरुणा गर्जे
