You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या ‘विशेष निमंत्रित सदस्य’ पदी शिवसेनेच्या प्रवक्त्या सौ.जान्हवी सावंत यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या ‘विशेष निमंत्रित सदस्य’ पदी शिवसेनेच्या प्रवक्त्या सौ.जान्हवी सावंत यांची नियुक्ती

तर युवा नेता संदेश पारकर, सतीश सावंत, विकास सावंत, बाळ कनयाळकर यांच्यासह ९ सदस्यांची नियुक्ती

जिल्हा नियोजन समितीच्या ‘विशेष निमंत्रित सदस्य’ पदी यादीत शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तिंचा यात समावेश

सिंधुदुर्ग

जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ सदस्यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाने  नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजन समिती मध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन जिल्ह्यातील ९ सदस्यांची नियुक्ती केली आहे.

९ सदस्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. यामध्ये शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, अतुल रावराणे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी,यांची शिवसेनेच्या गोटातून निवड झाली आहे. तर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक आणि बाळ कनयाळकर यांची राष्ट्रवादीच्या कोट्यातून निवड झाली आहे. तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांची काँग्रेसच्या कोट्यातून ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. जान्हवी सावंत यांनी कसाल मतदार संघाच्या जि.प.सदस्य व जि.प.गटनेत्या म्हणून २०१२-१७ ह्या कालावधीत तर जिल्हा नियोजन समितीवर ‘निर्वाचित सदस्य’ म्हणून २०१२-१७ या कालावधीत अभ्यासपूर्ण काम केले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा आरोग्य समिती, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, राज्य ग्रंथालय परिषद, जिल्हा नेहरू युवा केंद्र सल्लागार समिती इ.शासकीय समित्यांच्या सदस्यपदीही काम केले आहे. स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान व स्त्री राजसत्ता सह.संस्था च्या अध्यक्षा म्हणून सामाजिक आणि सहकार क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख म्हणून २०१६ पासून एक भक्कम महिला संघटन त्यांनी उभे केले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि मुलुख मैदान तोफ आणि पक्षाच्या प्रचार प्रसारातील उत्तम वक्ता म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.

जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती बाबत त्यांनी पालकमंत्री ना.उदयजी सामंत साहेब, शिवसेना सचिव खा.विनायकजी राऊत साहेब आणि जिल्हाप्रमुख आ.वैभवजी नाईक यांचे विशेष आभार मानले. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी संधी दिल्या बद्दल आभार मानले. जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून निश्चित पणे महिला आघाडी आणि कसाल मतदार संघाला लाभ होणारच आहे. महिलांच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी ह्या व्यासपीठाचा मी उपयोग करेन. समस्त महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिलांचा हा सन्मान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा