गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी घेतली भेट….
संशय व्यक्त केलेल्या त्याच कंपनीच्या मॅनेजरचे जबाब का नोंदविण्यात आले.. ?????
नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज खान याला रंगेहात पकडले होते.
याबाबत सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी मधील एका कंपनीत संशयास्पद व बेकायदेशीर हालचाली होत असल्या बाबत पत्र मनसेने कुडाळ पोलिसांना दिले होते. त्या वेळी ड्रग्ज व गांजा तस्करी बाबत तोंडी माहीती दिली होती.
गोवा येथे पकडलेल्या संशयित परवेज खान याचा संबधीत कंपनी मधे कायमचा वावर होता.
त्याच्या अटके नंतर मनसेकडून पत्रकार परिषद घेऊन आमच्या पत्राची दखल पोलिसांनी घेतली नाही असं सांगण्यात आले होते. व पुढील अधिक माहिती गोवा नार्कोटिक्स विभागाला देऊ असे जाहीर केले होते.
त्याप्रमाणे शनिवारी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली ,
उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,जगन्नाथ गावडे, प्रथमेश धुरी. या मनसे शिष्टमंडळाने गोवा पोलीस मुख्यालय पणजी येथे, अँन्टी नार्कोटिक्स विभागाचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमची भेट घेऊन केस संबंधि अधिक माहिती देण्यात आली
चर्चेदरम्यान मनसेने संशय व्यक्त केलेल्या संबधीत कंपनीच्या मॅनेजर सिराज नामक व्यक्तीचा गोवा पोलिसांनी त्यांच्या तपासा दरम्यान त्याची सखोल चौकशी करुन तपासात जबाब नोंदविला आहे. त्या मुळे संशय व्यक्त केलेल्या संबधीत कंपनी व त्याचा परिसरा चा ड्रग्ज माफिया वापर करत होते. हे सिद्ध झाले आहे.
जर सर्व आलबेल होतं तर मनसेने संशय व्यक्त केलेल्या एमआयडीसी मधील ती कंपनी तपासात रेकॉर्डवर का आली???? त्याच्याच मॅनेजरचे जबाब गोवा पोलिसांनी का रेकॉर्ड केले ???? याचा अर्थ मनसेचा संशय अगदी तंतोतंत खरा ठरला..
शनिवारी गोवा येथील भेटीनंतर काल मंगळवारी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेऊन ड्रग्ज व गांजा संबंधी चर्चा करण्यात आली. ड्रग्ज, गांजा व अंमली पदार्थ संबंधी जनजागृती करून त्याचे समुळ उच्चाटन या जिल्ह्यातून होण्यासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे, आणि भविष्यात अवैध धंद्यांविरोधी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधून लोकांनी माहिती द्यावी. पोलीस त्यावर 100% कारवाई करतील असे चर्चेदरम्यान सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांच्या कडुन सांगण्यात आले.