उन्हाळी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्या मार्फत जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटना व शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे, तरी सर्व विद्यार्थी खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
खेळाचा प्रचार व प्रसार होवून फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी 10 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळांचे शिबीरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शरीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
| ठिकाण | दिनांक | खेळ | वेळ | संपर्क क्रमांक |
| एस.एल देसाई विद्यालय पाट. तालुका –कुडाळ | 30 एप्रिल ते 9 मे 2025 | कुस्ती | सकाळी 8 ते 10 वा. सायं. 4 ते 6 वा.
| माधरी घराळ मोबा.9867699281 |
| शासकीय जलतरण सिंधुदुर्ग | 15 मे ते 15 जून 2025 | जलतरण | दुपारी 3 ते 4 वा. | प्रविण सुलोकर मोबा. 9850724878 |
| श्री सातेरी व्यायम शाळा, वेंगुर्ला | 28 मे ते 28 जून 2025 | वेटलिफ्टिंग | सकाळी 7 ते 10 वा | किशोर सोनसुरकर 9422596375 |
उन्हाही प्रशिक्षण शिबीर ठिकाण, दिनांक, खेळ, वेळ,आणि कंसात संपर्क क्रमाकांची माहिती पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आले आहे.
एस.एल देसाई विद्यालय पाट ता. कुडाळ येथे दि. 30 एप्रिल ते 9 मे 2025 रोजी कुस्ती, सकाळी 8 ते 10 वाजता तसेच सायं. 4 ते 6 वाजेपर्यंत (माधुरी घराळ मोबा. 9867699281)
शासकीय जलतरण सिंधुदुर्ग येथे दि. 15 मे ते 15 जुन 2025 जलतरण, दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत, (प्रविण सुलोकर मोबा. 9850724878)
श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला येथे दि. 28 मे ते 28 जून 2025 वेटलिफ्टिंग, सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत (किशोर सोनसुरकर मोबा. 9422596375)

