गिरणी कामगार व वारस यांची सभा गुरूवारी सावंतवाडी व कणकवली येथे
सावंतवाडी
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर उभारण्यात येणा-या लढयाच्या प्रचारासाठी कोकणात कामगार वारसांच्या सभा होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या गुरुवार दि.१७ एप्रिल रोजी सावंतवाडी व कणकवली येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
सावंतवाडी येथील काझी शहाद्दिन हॉल एसटी बस स्टॅण्ड समोर सकाळी ११ वाजता तर कणकवली येथे दुपारी ३ वाजता शिवशक्ती मंगल कार्यालय रेल्वे स्थानकाजवळ होणार आहे.
तसेच दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तर सायंकाळी ३ वाजता लांजा येथील अजिंक्य कार्यालय आणि दि.१९ एप्रिल रोजी चिपळूण व पोलादपूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.

