You are currently viewing जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त  कुणकेरी येथे आयोजित चष्मे वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त  कुणकेरी येथे आयोजित चष्मे वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त  कुणकेरी येथे आयोजित चष्मे वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी
माजी आमदार जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथे आयोजित केलेल्या चष्मे वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात मोफत नेत्र तपासणी व 70 रुपयांमध्ये चष्मे वाटप करण्यात आले.
जीजी उपरकर यांच्या वाढीदिवसाचे औचित्य साधून कुणकेरी येथे नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिर आयोजित केले होते. व मोतीबिंदू आढळल्यास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन देण्यात येणार आहे.सदर शिबिर श्रीदेवी भावई वाचनालयासमोर सावंत सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. येथील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत सदर कॅम्पचा लाभ घेतला व येथील अन्य ठिकाणी देखील याचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सदर कॅम्प निमित्त उपस्थितांकडून माजी आमदार जीजी उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपविभाग प्रमुख भरत सावंत कृष्णकांत सावंत बाबल सावंत अनिल परब विनोद सावंत यांसह पदाधिकारी उपस्थित होते तसेच उपस्थित पदाधिकारी व डॉक्टर यांच्या टीमने दीप प्रज्वलन करत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून उद्घाटन करत शिबिराला सुरुवात केली.या शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला असून नागरिकांकडून पुन्हा अशा शिबिराची मागणी करण्यात आली आहे. व असेच विविध कार्यक्रम आयोजित करून सेवा सप्ताह म्हणून माजी आमदार श्री उपरकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला व यापुढे देखील लोक उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत असे शिवसैनिक तथा युवा पदाधिकारी आशिष सुभेदार म्हणाले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा