You are currently viewing बांदा केंद्रशाळेत महामानवास विनम्र अभिवादन

बांदा केंद्रशाळेत महामानवास विनम्र अभिवादन

*बांदा केंद्रशाळेत महामानवास विनम्र अभिवादन*

*बांदा* .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी वाजत गाजत व विविध घोषणा देत बांदा बाजारपेठतून जयभीम रॅली काढली.यामध्ये शाळेतील विद्यार्थी हर्षद सुशांत ठाकूर याने डॉ .बाबासाहेबांची साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.
मुख्याध्यापक शांताराम असनकर‌ यांच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी स्वरा लांबर, जागृती शिंदे,रक्षा माने,शरण्या वायंगणकर,हेजल कारेकर,तेजस्वी गुरव, आयूष असनकर या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून तर दुर्वा नाटेकर हिने स्वरचित कविता सादर करून बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक , जे.डी‌पाटील , शुभेच्छा सावंत ,जागृती धुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांचे सलग एक तासभर अवांतर वाचन घेण्यात आले.यावेळी उदय असनकर, उत्कर्षा असनकर, वसंत जाधव, संदीप वायंगणकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा