You are currently viewing जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य – मंत्री नितेश राणे

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य – मंत्री नितेश राणे

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य – मंत्री नितेश राणे*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्री नितेश राणेंनी केले अभिवादन*

कणकवली*

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नागरिकांना जगण्याची संधी मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे हे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी कणकवली शहरातील बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, कणकवली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा बॅंकेचे संचालक विठ्ठल देसाई, अंकुश कदम, भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये, समीर प्रभूगावकर, गणेश तळगावकर, माजी नगरसेवक अॅड. विराज भोसले, गौतम खुडकर, कान्हा मालंडकर, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी बुद्ध विहारात जाऊन तथागत गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांना आंबेडकर आयुनयांनी संविधानाची भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा