*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवण येते…..*
दुरावा प्रियेचा साहिनाच मज
आठवण येते किती किती आज….
मोहरून येती क्षण जुने आज
पाय न वाजती हलकेच गाज
भरती ओहोटी चांदण्यांचा साज
आठवण येते किती किती आज….
सजवावी वाटे प्रीत ती नव्याने
पुन्हा साद देती जुने ते बहाणे
उसना तो राग पहाटेची जाग
आठवण येते किती किती आज…
चंद्रचांदण्यांच्या किती छान रात्री
पहाटे पहाटे मोहरते धात्री
मंद मंद भासे धुक्याचा आवाज
आठवण येते किती किती आज…
जगावेगळी ती प्रीत असे न्यारी
आज जागविते पहाट प्रहरी
तोच चंद्रमा नि नक्षत्रांची दाद..
आठवण येते किती किती आज….
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)