You are currently viewing सांगवे गावच्या सुपुत्राचा होणार राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान…..

सांगवे गावच्या सुपुत्राचा होणार राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सांगवे (केळेवाडी) गावचे सुपुत्र पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद भाऊ सावंत-पटेल यांचा २६ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रपती पोलीस पदकाने (President Medal for Distinguised Service Republic Day 2021) सन्मानित करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद सावंत-पटेल यांच्या पोलीस दलातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील सुपुत्राला राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येत असल्याने हा जिल्ह्याचा देखील सन्मान आहे. सावंत-पटेल उत्कर्ष मंडळातर्फे देखील पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद सावंत-पटेल यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो अशा शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा