परशुराम उपरकर यांच्या वाढदिनानिमित्त आरोग्य शिबीर
सावंतवाडी
माजी आमदार व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सावंतवाडी काजी शहाबुद्दीन सभागृहात येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.या शिबीरात संपूर्ण शारिरीक तपासणीसह अॅक्युप्रेशर व फिजीओथेरेपी उपचार हे संगणकीय अॅटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने करण्यात येणार आहे.
यामध्ये इसीजी तपासणी, हृदय व मेंदूच्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता व हिमोग्लोबीन आणि ब्लडप्रेशर, त्वचेची तपासणी, पचनसंस्थेची कार्यक्षमता, लिव्हर कार्यक्षमता, फुप्फुसाची तपासणी, मेंदूच्या
रक्तवाहिन्यांची तपासणी, हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, लठ्ठपणा, कानाची तपासणी, ब्लडशुगर, मिनरल, जीवनसत्त्व, अॅमिना अॅसिड, बेसिक फिजिकल क्वॉलिटी, मुत्रपिंड, रोगप्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवीमेटल, डोळ्यांचे आरोग्य, अॅलर्जी, त्वचा व शरीररचना, रक्तातील चरबीचे प्रमाण, आतड्यांचे आरोग्य, थायरॉईड कार्यक्षमता, पल्स ऑक्सीमीटर, पित्ताशय, स्वादूपिंड, पुरुषांकरिता प्रोस्टेट, मासिक पाळीबाबत मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला असून कोंडुरा माऊली मुकबधीर विद्यालयात स्नेहभोजन आयोजित करुन साजरा करण्यात आला तर येत्या 14 एप्रिल रोजी माजी आमदार जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबीर आयोजित केले जाणार आहे.या मोफत भव्य आरोग्य शिबीरात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,तालुका प्रमुख मायकल डिसोजा,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार,शहर प्रमुख शैलेश गवंडळकर,शहर संघटक निशांत तोरसकर,आशिष सुभेदार यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सावंतवाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.