You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्य-वंदना काव्यपुष्प- १७ वे ।।

श्री स्वामी समर्थ काव्य-वंदना काव्यपुष्प- १७ वे ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

।। श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ।।

__________________________

श्री स्वामी समर्थ काव्य-वंदना काव्यपुष्प- १७ वे ।।

__________________________

 

भले करणे जमले नाही । काही हरकत नाही ।

विचार वाईट मनी येऊ नाही । एवढे करावे स्वामी हो ।।१ ।।

 

अर्थ असावा बोलण्यात । अनर्थ नको शब्दात । असू द्या

ध्यानात । भक्तजन तुम्ही हो ।। २ ।।

 

एक तरुण साधक होता । ईश्वर दर्शन हेतू मनात होता ।

दोन तपे हिमालयात फिरत होता । शोधात गुरूंच्या ।। ३ ।।

 

व्हावे शंका निरसन । सदा हेचि मनन । साधकाचे अस्थिर राही मन । सदा सर्वकाळ ।। ४ ।।

 

गुहेत आल्यावर । दिगंबराचार्यांना पाहिल्यावर । हर्ष झाला अनिवार । साधकाच्या मना ।५ ।।

 

दिगंबराचार्यांना पाहून । मनी त्याच्या पटली खूण । हेच करतील निरसन । माझ्या मनाचे ।। ६ ।।

 

स्वामी म्हणाले त्यास । आहे तुझा अभ्यास । तुज ज्ञानाचा आहे ध्यास । मिळेल यश वत्सा तुजला ।। ७ ।।

 

साधकाने नम्रतेने विचारले । स्वामी मज सांगावे भले ।

मी पाहिजे काय केले । भक्ती समजण्यासाठी ? ।। ८ ।।

************************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा