*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हुरहुर लागे जीवा*
नजर पडता फोटोवर
शेंग कोवळी पाहिली
आला होकार चालून
मुलगी आईला दुरावली
सून जरी लाडाची
प्रपंच तिला नवा
सोसली जरी हवा
*हुरहुर लागे जीवा*
केला विचार नव्याने
नाही स्थळ वाईट
खाऊ पिऊ भरपूर
नाही सासूही खवचट
बाप गेला लटकून
कर्जाचे ओझे झाले
सासरे साधे *सांब*
आहेत भावात थोरले
हुरहुर नाही चुकत
जन्म फुकट बाईचा
माय ढाळते अश्रू
तोच दागिना माहेराचा
नवरा जातो रानात
हुरहुर लागते जीवाला
जन्म बाईचा मेला
चिंता करण्यात गेला
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

