You are currently viewing ती

ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*…ती…!*

 

माळून मोगरा हा वेणीत मिरवते ती

सजवून चेहऱ्याला दारात मिरवते ती

 

वेडेपणा म्हणावा की नाद लागला हा

श्रृंगार बाहुलीचा गावात मिरवते ती

 

गाली कळी फुटावी प्रेमास वेड लावी

रात्रंदिवस उगाची स्वप्नात मिरवते ती

 

पाहून चंद्र आनंदी ठेवते स्वताला

नजरेस चांदण्यांच्या विश्वात मिरवते ती

 

कोठून रोज येते जगण्यास बळ तिलाही

विरहात रात्र जाता दिवसात मिरवते ती

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा