लोरे ल. पा. योजना अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (PDN) कालवा संदर्भात…
श्री. निलेश अशोक राणे व श्री. रमेश विश्राम राणे यांचे लाक्षणीक उपोषण सुरू
कणकवली
लोरे ल. पा. योजना ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (PDN) कालवा संदर्भात श्री. निलेश अशोक राणे व श्री. रमेश विश्राम राणे यांनी लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी सकाळीच उपोषण आंदोलनास प्रारंभ केला.
उपोषणकर्त्यांनी खालील मागण्या साठी उपोषण सुरू केल आहे.
१) ह्या कालव्याच्या बांधणीसाठी २,४९,५३, ३९३ एवढी रक्कम खर्च होऊन पण लोरे व वाघेरी येथे सद्यस्थितीमध्ये पाणी येत नाही आहे.
२) ह्या कालव्याचे बांधकाम करतेवेळी तेथे असणारी झाडे तोडण्यात आली त्या झाडांचा मोबदला त्या जमीन धारकांना मिळावा.
३) सन २०२१,२०२२,२०२३,२०२४ आणि २०२५ ह्या साली तेथे पाणी आले नाही, म्हणून सलग ५ वर्ष शेतकरी तेथे शेती करू शकला नाही. ५ वर्ष शेती न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ५ वर्ष झालेले शेतीसंबंधी (भुईमूग, सूर्यफूल, तिळी, चवळी, मूग, ऊस ) ह्या पिकांचे ५ वर्ष झालेले नुकसान तुम्ही भरून द्यावे..
४) ह्या सर्व कारणांसाठी दिनांक ०९/०४/२०२५ पासून लोरे नं. १ येथून पाईप लाईन गेली आहे त्याच्या मध्य भागावर फोंडा वैभववाडी महामार्गालगत तसेच मोना वहाळ नजीक लाक्षणीक उपोषणाचा मार्ग अवलंबत असल्याचे.
उपोषणकर्ते – श्री. निलेश अशोक राणे व श्री. रमेश विश्राम राणे. यांनी सांगितले.