You are currently viewing माहेरचे दैवत…

माहेरचे दैवत…

*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माहेरचे दैवत…*

 

मायबापाविन माहेर

देवाशिवाय देवघर

लागे जिवा हुरहुर

येई दाटुनी गं ऊर

 

पाय ठेवता दारात

वाटे माय येईल धावत

पाठीवरुनी प्रेमाने

तिचा फिरेल गं हात

 

बाप बघेल कौतुक

डोळ्यातील आसू लपवीत

मायबापाविन माहेरी

जीव नाही गं लागत

 

क्षणभर ते दिस

येतील का परत

हळूच शिरेन मी

माय बापाच्या कुशीत

 

होते मायबाप माझी

माहेरातील दौलत

वाटायचे तेव्हा मला

साऱ्या जगी मी श्रीमंत

 

त्यांच्या प्रेमाची सर

नाही कशालाही येत

होते तेच तर दोघे

माझे माहेरचे दैवत

 

@अरुणा गर्जे

प्रतिक्रिया व्यक्त करा