You are currently viewing साळगांव मधील ९६ वर्षांची आजी घरकुल योजने पासून वंचित

साळगांव मधील ९६ वर्षांची आजी घरकुल योजने पासून वंचित

साळगांव मधील ९६ वर्षांची आजी घरकुल योजने पासून वंचित

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील साळगांव घाटकर वाडीतील श्रीमती सरिता बापू पवार , वय वर्ष 96, अनेक .घर नबर-591,नात वर्षा बाळकृष्ण पवार, वय- 39
मयत वडील बाळकृष्ण बापु पवार कोरोणात काळात 5 मार्च 2020 रोजी मयत झाले.2009 पासुन घरकुल योजनेसाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण अद्याप कोणतीही दखल घेतली नाही आहे.तसेच सध्या परिस्थितीत घर हे मातीचे असुन पुर्णत: मोडकळीस आलेले आहे.श्रीमती सरिता बापू पवार या ९६ वर्षाच्या असुन घरात फक्त मोलमजुरी करून कमावणारी नात वर्षा बाळकृष्ण पवार, वय- 39 रहाते .घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गेली पाच ते सहा वर्षे घरावर काळा कापड टाकुन रहातात .माती घ्या घराला मोठ्या भेगा गेलेल्या आहेत, छप्पर पुर्णतः मोडकळीस आलेले आहे.पावसाळा आता तोंडावर आल्याने आता काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी त्वरित संबंधीत प्रशासनाने यावर कार्यवाही करुन या कुटुंबाला सहकार्य करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा