मालवणात २७ एप्रिलला जिल्हास्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा
भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजन
मालवण
भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवण च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त संस्था, कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि २००६ बारावी बॅच पुरस्कृत भव्य जिल्हास्तरीय प्रो- कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २२ वर्षाखालील मुले व मुली अशा दोन गटातील ही स्पर्धा रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे.