गाळेलमध्ये कालव्यात बिबट्या मृतावस्थेत
बांदा : प्रतिनिधी
गाळेल – खालची वाडी येथे मृतावस्थेत बिबट्या आढळून आला आहे. सदर बिबट्या गोव्याच्या हद्दीत कालव्यात पडून वाहत गाळेल येथे पर्यंत आला असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. आठ दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता बांदा वनपाल प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. थोड्याच वेळात वनविभागाचे रेस्क्यू टीम दाखल होणार आहे