You are currently viewing प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण

प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण

प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण

मालवण :

सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या पुढाकारातून आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी पर्यटक व ऑटो रिक्षा वाहन चालक यांचा दुवा म्हणून काम करणाऱ्या मोबाईल ॲपचे लोकार्पण रामनवमीच्या निमित्ताने मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते केक कापून भरड येथील मालवण हेरिटेज येथे संपन्न झाले. झॅपॲप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे ॲप विकसित केले आहे.

सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू मालवण आहे. येथे नैसर्गिक विपुलता मोठया प्रमाणात आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक याठिकाणी अनेक भागात भेट देताना. अनेक पर्यटकांना प्रवासा दरम्यान रिक्षाची आवश्यकता असते. तसेच स्थानिक नागरिक यांच्याही रिक्षा प्रवासाची गरज ओळखून प्रवास आपल्या माणसांसोबत या संकल्पनेतील ‘येतंव’ ऑटोरिक्षा ॲप महत्वपूर्ण ठरणार आहे. हे ॲप उपलब्ध करून देण्यात सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. प्रवासी आणि रिक्षा व्यावसायिक यांसाठी येतंव’ ॲप महत्वाचे पाऊल ठरेलं. असा विश्वास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा